ह्या जगात काहीतरी असतं
काही माणसं असतात
काही फ़क्त माणसं असतात
काहींना नावही असतं
काहींना नावासकट चेहराही असतो
काही चेहर्यांना रंग असतो
काही रंगांच्या शेड्स असतात
काही शेड्स ना डेप्थ असते
काही डेप्थना तळ असतो
काही तळांना भेगा असतात
काही भेगांना आकार असतो
काही आकारांना आवाज असतो
काही आवाजांत भावना असतात
काही भावनेत इच्छा असतात
काही इच्छांचा शेवट असतो
काही शेवटांची सुरुवात असतो
आणि त्या सुरुवातीला
पुन्हा....
काही माणसं असतात.....
तरीही,
काही नात्यांना "नाव" का असतं?
changli aahe kavita...........
ReplyDelete