Tuesday, March 30, 2010

ईंटरसेक्ट

रेल्वे ट्रॆकच्या
रुळासारखे
रिलेशनही
गुंतत जातात
एकमेकांत
अनेकदा ईंटरसेक्ट करत

दोन रुळांमधल्या
अंतराला
एक कॊंक्रीटचा दगड
सांभाळत असतो
जशी आपली आयडोलॊजी
आपल्यालाच

रिलेशनशीपचा
पॊईंट ऒफ़ व्ह्यु बदलत असताना
ट्रॆकवरंन
ट्रेन
सुसाट निघते
डेस्टीनीकडे
रोज
चर्चगेट ते विरार
किंवा छत्रपती टर्मिनस ते जाईल तिथे
आणि थांबत आयुष्य
हव्या त्या स्टेशनवर
जिथे जिवंत माणसं असतात

मनातल्या ट्रॆकचा
गुंता झालाय
असा विचार करत
रोज
लेडीज डब्यात शिरते
मीरा
आणि
एकटक बघत राहते
ट्रॆक
गुंतलेले
गुंतत जाणारे
गुंतुन राहणारे
तिचं
स्टेशन
येता येता.......

Sunday, March 28, 2010

मीरा

दादर स्टेशनच्या
रेल्वे प्लॆटफ़ोर्मवर
संध्याकाळच्यावेळी
डिऒड्रंट व घामाचे
सुकलेले शरीरावरचे फ़्रस्ट्रेशन घेऊन
भेळीप्रमाणे मिक्स होत जाणार्या
अर्बन आणि रुरल गर्दीच्या
दरम्यान
निश्चल उभी होती
इंडीकेटरखाली
मीरा
शोधत तिच्या
क्रूष्णाला
इसवी सन दोन हजार दहाच्या
गजबजलेल्या ठिकाणी
तिला तो
ऒझरता दिसावा
म्हणुन
जेन्ट्स कंपार्टमेंटकडे
रोखलेली नजर
शुन्य होऊ लागली
इंडीकेटरच्या आकड्यांखाली
ती आता एकटीच
मुर्तीप्रमाणे स्तब्ध झाली
काळ पुढेही सरकतो
हे तिला माहीत नसावं
जेन्युएन कमिटमेंट
मीराच्या नशिबात
नव्हतीच कधी
वरदान म्हणुन फ़क्त
इच्छा होती
त्याला पाहण्याची
डोळे भरुन
शेवटचं......
पुन्हा
किंचित
ऒझरतंच
तिने पापण्या बंद केल्याही असत्या
पण
प्रेम व्यक्त करण्याचं
भाग्य
कधीच नव्हतं
अर्बन मीरेच्याही
नशिबात
आणि शिरते
लेडीज कंपार्टमेंटमध्ये
प्रवास करायला
नेमका कुठला
तो
तिलाच
ठावुक
पण...........
प्रवास करावा लागणार
हे मात्र
नक्कीच
कळलेलं असावं
मीराला ...!

Friday, March 19, 2010

सुर्य

तुला पारख्या
आज इथल्या दिशाही
तरी सावलीची
थोडी साथ आहे
जरी लुप्त होते ती
अंधारताना
इथे सुर्य जळतो
तुझ्या आत आहे

तारांगणाची नसे
भव्यमाया
तिथे छेडतो स्पंदनी
धुमकेतू
उल्का आसवांची
किती साचली रे
चाहुल वादळाची
तुझ्या आत आहे

पावभाजी

तव्यात पडल्या ओल्या ओल्या
उकळुन भाज्या हळुच सार्या
मटर जरासे भांडुन करती
सिमला मिर्चिशी मारामार्या

गरीब बिचारा इथे बटाटा
वाडग्यात आधीच घाबरला
तव्यात चेचुन चेचुन हलके
अलगद साल्याला कुस्करला
पेटुन उठल्या वाफ़ा आता
जशी जळावी चिता
का भाज्यांच्या नशीबी नसते
त्यांची भगवदगीता !

उडी मारुनी तव्यात आता
बटर भयानक येतो
विरघळुन भाज्यांवर टोणगा
अख्खा एरीया घेतो
जिरे टाकुनी होऊ लागते
एरीयावरही हल्ले
बळी गेलेल्या भाज्यांचे
कसे ऎकु येतील सल्ले?

आल्यालसणाची पेस्ट दिवाणी
सगळ्या पब्लिकवर पडते
जशी नकोशी असे प्रेयसी
त्यासम क्षणभर अडते
चारही दिशांना तव्यावरुनी
भाजी फ़िरते सारी

जखमेवरती मीठ मसाला
टाकुन होतो शेवट
कुणास सुचली अशी अवदसा
कुणास जमला हा कट

भाजी आता भाजुन लाजुन
होऊ लागते लाल
जनावरांच्या प्रथेसम इथल्या
ह्या भाज्याही हलाल !

IRONY




च्यायला आपल्याला जी आयरनी वाटते ती दुसर्यांची नसतेच मुळी....आणि मग आपण विरोधाभासातल्या बेरजा व वजाबाकी शोधु लागतो..... तिथेही कुणाची बेरीज वजा असते तर कुणाची वजाबाकी बेरजेत ग्रेट..... तर ह्या फ़सणार्या गणिताचा आपण इतका विचार का करतो...चला गणित जमत नाही म्हणुन टाळतो देखील!! तरीही सरलेलं....सरत असलेलं....सरणारं आयुष्य मोजण्याची एक वेगळीच खाज असते ती का?????????
हे असं आहे ! हे असं असावं आणि कदाचित हे असं कायम राहील देखील....ह्यातुन आपण नेमका कुठला मॊरल शोधत असतो? बरं हरवलेली गोष्ट शोधली जाते....ती....सापडण्यासाठीच!!! इनडेफ़ीनेट गोष्टींना डेफ़ीनेट मानुन त्यांच अस्तित्व फ़क्त आपल्यापुरतंच असतं..मग आपण काहीतरी शोधत असल्याचं प्रिटेंड करु लागतो....वेळ जाण्यासाठीच...त्यात व्यक्तिंपासुन व्रुत्तीपर्यंत सगळं सामावलेलं असतं आणि सरतेशेवटी (कशाच्याही)
नेमकं काय कसं आहे??..नेमकं काय कसं असावं??..आणि नेमकं काय कसं कायम राहील?? ह्यातला ब्लॆंकनेस पर्सनल असतो...उत्तर पर्सनल असतं...ज्यास सोशल अथोरटी मिळते...कदाचित हे जन्माचं म्रुत्युपर्यंतच्या ट्रांसफ़ोर्मेशनबद्द्ल असावं बहुदा

Sunday, March 7, 2010

रोमियो

सिगमंड फ़्रॊईडच्या सबकॊंशियस थिअरीने
मॆस्टरबेशनला पॆलु दिले
पण का?
कल्पनेतल्या विज्युअल्सवर
पर्सनल ऒथोरीटी असताना
इमोशंस जनरल करुन
उगाचंच मर्यादा आल्या
एक्सप्रेशंसवर
आणि कुठल्याही आर्टीस्टच्या
बायसेक्श्युआल ऎप्रोचसारखे विक्रुत झाले
डेलिकेट इंप्रेशन
आपलेच आपल्यात
अनेकदा
हे एवढं सांगण्याचं तात्पर्य इतकच
सध्या डोळे बंद केल्या केल्या
एका बाल्कनीखाली
मान वर करुन उभा दिसतो
रोमियो
वाट बघत.....ज्युलिएटची
आता हे स्वप्न माझंच असल्याने
अधिकारव्रुत्तीनेच एक प्रश्न विचारला
"तु इथे केव्हापास्नं आहेस?"....मी हे नाही विचारणार
पण......
"कुठपर्यंत राहणार?" ह्याचच कुतूहल आहे मला
प्रकाशकिरणांइतक्या भिडस्त असलेल्या त्याच्या नजरेने
मान न फ़िरवता
फ़क्त आवाजाची दखल घेतली
शेक्सपिअरच्या संवादांच्या विरोधात जाऊन
त्याचं प्रतिउत्तर ऎकू आले
"जो पर्यंत प्रियकरांना माझा तिरस्कार वाटत नाही
कदचित....तोपर्यंत"
त्याचं ऎकुन
पापण्या लख्खपणे उघड्या झाल्या
जणु त्या वाक्याने दारावर लाथ मारली
निरोप घेण्याआधी
त्यानंतर भीती वाटु लागली
झोपेची
कारण........
डोळे मिटताना
किलकिल्या पापण्यांआड
मी
ज्युलिएट्च्या बाल्कनीला
सुरुंग लावताना पाहीलं
माझ्या
रोमियोला
ज्याला कळुन चुकलेलं की......
Everything is fair in love and war
love is over....
let me be the part of war
known as.............
Life...!!