Wednesday, February 17, 2010

मोनोटोनस

ह्या जगात काहीतरी असतं
काही माणसं असतात
काही फ़क्त माणसं असतात
काहींना नावही असतं
काहींना नावासकट चेहराही असतो
काही चेहर्यांना रंग असतो
काही रंगांच्या शेड्स असतात
काही शेड्स ना डेप्थ असते
काही डेप्थना तळ असतो
काही तळांना भेगा असतात
काही भेगांना आकार असतो
काही आकारांना आवाज असतो
काही आवाजांत भावना असतात
काही भावनेत इच्छा असतात
काही इच्छांचा शेवट असतो
काही शेवटांची सुरुवात असतो
आणि त्या सुरुवातीला
पुन्हा....
काही माणसं असतात.....
तरीही,
काही नात्यांना "नाव" का असतं?

टॆंगो

निर्मनुष्य रस्त्यावर
गंमत म्हणुन
टॆंगो केला
सगळ्यांना सांगितलं
हातांच्या व्हॆक्युममधे
आहे कुणीतरी
नाही कळायचं तुम्हांला....
बोटांच्या रिकाम्या जागासुध्दा
भरलेल्या आहेत
घट्ट.....
त्या साध्या डोळ्यांना दिसत नाहीत.....
कुणीतरी अगदी जवळ्देखील आहे
त्याला म्हणतात
भास..!!
कुणीतरी आहे
यापुढे......भासच म्हणुया
हवतरं....
पण मित्रांनो
टॆंगो मात्र रोज झालाच पाहीजे......
हो की नाही??

मॆगी


इंस्टंट मॆगी...उकळुन घ्यायचीत्यात चवीचा मसाला टाकुननुडल्स खेचुन घ्यायचेआणि शेवटीपाहत राह्यचारिकामा बाऊल...!!आयुष्यात अगदी असंच सारंकाही इंस्टंट मिळालं असतं तर???कारण...इंस्टंट गोष्टीपुन्हा पुन्हा कराव्याश्या वाट्तात.....मग हळुहळूसवय लागते सर्वइंस्टंट गोष्टींची......थोड्क्यात संपुन जावं सगळं!!कारण इंस्टंट गोष्टीपर्याय असतात....ना...तात्पुरत्या...!!मग आयुष्यातल्याआठ्वणी आपणछोट्या छोट्या पॆकेट्समध्येसीलबंद करतो.....काही सींगल पॆककाही डबलकाही तर चारचाईकोनॊमी पॆकचपण त्या आहेतइंस्टंट गोष्टीं!!आपल्याचआपल्यापुरत्याच....





कुतुहल

प्रत्येक शेवटाला एक नवी सुरुवात असते..
तर मोह कशाचा ठेवायचा?
शेवटाचा की...
सुरुवातीचा...!!??
आणि अर्ध्यावर राहीलेल्या गोष्टींबद्द्ल काय??
पश्चाताप? समाधान? सुटका?
की
ती गोष्ट अर्ध्यावर सोडण्यात आपण यशस्वी ठरलो
ह्याचा आत्मविश्वास???
इथे राग नाहीये
आणि कदाचित
उत्तरसुध्दा....!!
काही स्वप्न कुणीतरी पाहण्यास भाग पाडली
ह्याचंच कुतुहल जास्त...!!!

डायलॊग

काल नाट्क झालं
चर्चगेटला
अख्खं ऒडीटोरीयम हाऊसफ़ुल्ल....
आणि मी बसलेलो
रिकामं मन घेऊन....
त्या सीट्वर.
स्वत:ला प्रश्न विचारत
जिच्या वेडापायी लेखणी
हातात घेतली
ती यापुढे सोबत नसणार?
का...?
आता नाट्कातला एकही डायलॊग
ऎकू येत नव्हता
साखळी बनत होती
प्रश्नांची
न तुटणारी
माझ्या
उत्तरांनी
चेहरा लपवलेला
निर्लज्जपणे.....
मग, मध्येच टाळ्यांचा कडकडाट ऎकू यायचा
कारण नाटकातल्या प्रत्येक वाक्यावर तिचा हक्क आहे
थियटरच्या काळोखात जोरात किंचाळावसं वाटलं
कि....थांबवा हे नाटक.....!!!!!!!!!!!!!!!
मला माझंच आयुष्य चव्हाट्यावर आणायचं नाहीये
मला असंच व्यक्त होता येतं
होत राहणार
कारण माझ्याकडे पर्याय नाहीये
माझ्याकडे भविष्य नाहीये
वर्तमान आहे जो फ़क्त सरकतोय
सहा वर्षांपुर्वीही सरकतंच होता
आताही सरकेल
तिच्यामते
"काळ हा सर्व गोष्टींवर उपाय असतो..!"
तर मग ह्या उपायामुळे नॊर्मल झालेले दाखव
अचानक थियटरच्या लाईट्स ऒन झाल्या
नाटक रंगमंचावर संपलेलं
जे संपणारंच होतं
सगळेजण माझ्याकडे पाहत होते
आणि मी मनातल्या मनातंच
गुंतलो
तिच्यासोबत......
तीच देत होती धीर मला
नवी वाक्य जुळवत
पण ...यंदा ती स्वत:शीच वेड्यासारखं बडबडत होती
"The one who sayss what.....if u fall down......i will b your support!!
मी हे वाक्य फ़ारपुर्वी बोलुन गेलेलो
तेव्हा तिने हे ऎकलं नसावं
कदाचित.....
आजकाल तिला सतत
एकच प्रश्न पडतोय
Sometimes you see a person, and you wonder why you?
आता थियटरसुध्दा रिकामं झालेलं
तरीही घुमत होता एकच
प्रश्न....
Sometimes you see a person,
and you wonder
why
you..........?

आंधळी कोशींबिर

सत्य स्वीकारणं ही आयुष्यातली
सगळ्यांत मोठी जबाबदारी
आणि ते लपवणं
म्हणजे
आव्हान..!!!
पुष्कळदा स्वत:लाच दिलेलं.....
इच्छा कधीच पुर्ण होत नसतात
त्या फ़सवतात
अगदी
आंधळी कोशींबिरच्या खेळाप्रमाणे....
आपण डोळ्यांना पट्टी लावुन
शोधत राहतो त्यांना....
पण कुठपर्यंत...???
मग स्वत:च खेळ संपावा म्हणुन...
डोळे उघडण्याचा निर्णय घेतो........
आणि सत्य स्वीकारतो
जे आहे ते......
जे दिसेल तसं....
कदाचित खेळ
थांबतो प्रत्यक्षात...
आणि आता डोळे आपोआप बंद होतात
न दिसणारी
आंधळी कोशींबिर खेळायला.....
कायमचे
सतत..!!

Monday, February 15, 2010

हॆंगओवर

निऒन लाईटचा प्रकाश
बारचा कॆश काऊंटर
त्यावर बहुदा
साईबाबांची फ़ोटोफ़्रेम
(निर्व्यसनी देव होता तो....)
गिर्हाईकांचा कॆऒस
अलंकारीक शिव्या
ऒर्डर्सचा रिदम
आरशावरचा नो स्मोकींगचा
सरकारी सक्तीमुळे
अड्कवलेला बोर्ड
ग्लासांच्या टकरींचा साऊंड
गिधाडांप्रमाणे उश्ट उचलणारे
वेटर्स
तो उगाचचा मंद प्रकाश
त्यात वोड्काची प्युरीटी
रमचा डार्कनेस
व्हिस्कीतला रॊमॆंटीसीजम
बियरची इंटेंसीटी
आतापर्यंत अनेकांच्या गळ्यातुन
उतरलेली
जसं थांग गाठताना
अर्थ
शेंगदाणे चणे चघळत
जड झालेली जीभ
आता शब्दांच्या ओझ्याखाली दबते
प्रत्येक घोटागणिक मनातला ताण
होऊ लागतो
सॆल
तेव्हा...........
इमोशन्सच्या धनुष्यातुन
नेमका विषयांचा बाण सुटतो
मग होतात घायाळ
आठवणी
हॆंगओवरच्या खांद्यावर डोकं ठेवुन
अनेकदा

थिअरी.......

रेषा....आकार.....रंगांची
कंपोजिशन्स सांभाळत
आर्टीफ़िशियल एक्साईटमेंटमध्ये
रमला होता
प्रत्येकजण काळाघोडा फ़ेस्टीवलमध्ये
कलेसाठी कला करणारे
पोटासाठी कला करणारे
स्टॊल्स थाटुन
उभे राहीलेले
कलेच्या बाजारात
लिलाव करत
टॆलेंटचा!
अस्थेटीकचा....
इसेंसचा....
सो कॊल्ड.....प्युअर आर्टचा
इकोनॊमिकल बॆलेंस सांभाळुन

फ़क्त रिदम हाऊसच्या
फ़ुटपाथावर
डोंबारी मात्र
तोल सावरत होता
दोरीवर
सर्व्हायव्हलसाठी
आणि तिथेच सापड्लं
पहीलं टोक
कलेचं
दुसरं टोक
गुंतलेलं
सोफ़ेस्टीकेशनच्या
थिअरीत......

Wednesday, February 10, 2010

ईडीपस


ek gadI- TaLuna

dusayaa gadI-t iSarNyaalaa Aata

saravalaaoya maI

AaiNa Aajakala pazmaaorI maaNasaMsauQda

AaoLKtao

svat:cyaaca\ tMd`It jaat Asatanaa

GaaoL@yaamaQauna par haoNyaasaazI

Anaok faTo fuTlaolao Asatat

%yaatuna AgadI sahja maaga-

inaGauhI Saktao

pNa tumhaMlaa saaMgatao bayaacaSyaa

maagaa-t

ADqaLo Asatat...naajauk

hvaohvaosao

AaiNa maga vaaTU laagatM

hao} do qaaoDasaa ]iSar

Acaanak mana Baanaavar yaotM

ApraQaIpNaa vaaTuna pavalaM rsta k`a^sa krayalaa vaLtat doiKla

tovaZ\yaat [DIpsa jaaorat SaIL maa$na qaaMbavatao

AaiNa ivacaartao “rsta k`a^sa krtaoyaMsa? ka?

maI ]

“%yaa ADqaL\yaaMmaQyao mana BarkTtM....”

tao ivacaartao malaa “ %yaa, ADqaL\yaaMnaahI, tsaMca\ vaaTt Asaola?

maaJyaamato kdaicat “...naahI”

tao Aata saaMgatao “karNa %yaaMnaa ha [DIpsa zavauk nasaavaa”

[t@yaat samaao$na ek

13 14 vaYaa-caI maulagaI yaotanaa idsalaI

Aata [DIpsa doiKla rsta AaolaaMDuna

maaJyaasaaobat caalat haota

%yaanao punha ivacaarlaM “AaoLKtaosa hIlaa?

maI taopya-Mt itcaM naava ivasarlaolaao

[DIpsa mhNaalaa kI

“itcyaa roKIva baaMQyaasamaaor naahI saucaNaar tulaa”

maI %yaalaa itqaMca\ raoKlaM AaiNa mhMTlaM

“naahI...malaa saucalaMya....malaa saucatMya....”

tao Aata kanaacyaa AgadI javaL yao}na baaolalaa

“ka..ya..?

maI JaT@yaat maana vaLvalaI

tI maulagaI ikMicat maagao vaLuna

phat haotI

kdaicat [DIpsacyaa “kaya”caM ]

tI SaaMtta haotI malaa stbQa krNaarI

Aata maI [DIpsalaa kahI ivacaarNaar

tr tao

navhta

AajaubaajaUlaa

samaaor Ad\yaaphI tI maulagaI caalat haotI

yaoNaaro jaaNaaro

vaLuna vaLuna phat haoto itlaa

maI maa~a maana KalaI GaatlaI

Sarmaonao

karNa maI jao TaLt haotao

to [tr saarojaNa nyaahLt haoto

maI

[DIpsa pasauna lapvalaolaM kI....

tI maulagaI maaJyaa AMgaaKaMd\yaavar

KoLlaolaI

lahanapNaI

“kahI AvayavaaMcyaa KoLacaI AapNa puYkLda klpnaa krtMca jagatao”

AsaM baaolat

[DIpsa KaMd\yaavar hat Takuna caalau laagalaa

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

SaovaTI AapNa ‘manauYyap`aNaI’

jaao Baavanaa

maaMDtao

hoca

tovaZM

sa%ya.

सुरुवात

Aajak ala maI SaaoQataaoya\ maaJaI saur}vaata

naomak I ku zlaI ro?

AsaM KaaMd\yaavar hata Taku na ivacaarayalaa

saQyaa ima~a saaobataIlaa naahI,

maOi~aNaIMcaI saMKyaaca\ jaasta

tyaamauLo, Hyaata daoYa tyaaMcaahI naahI,

bahuda!

mhNauna svata:caM baoDr}macaM dar laa^k\ k r}na

inala-jjapaNao AarSyaasamaaor jaa{}na {Baa rahtaao maI

AaiNa ikM icata hsataMca\ ivacaartaao

k aya ro, TaoNagyaa AazvalaI k a saur}vaata?

Aarsaa saaMgataao k I laok a, maI itaqaoca\ Aaho

jaata naahIyaosa tao tau. .

taao AazvaNa k r}na dotaao malaa

dr idvasaalaa imaLNaa%yaa dha r}payaaMcaI

tyaacyaa paO na paO ko laolyaa Kacaa-caI

ima~aaMcyaa iKaSaata tyaaMcyaa dha r}payaaMsaaobata

k ahI vajanadar naaNaIdoKaIla AsaayacaI

AaiNa maI Aajamaavata haotaao

maaJyaa naiSabaacaM vajana

Sabd igarvata ..

jyaaMcyaa BaivaYyaacaa AMdaja navhtaa k QaIhI

k ahIhI nasataaMnaa k ahItarI AsaNyaacaI QaDpaD

raoja k^ NTInamaQyao lao@casa- d\yaayacaI

tao baMk naahI ko lao mhNauna maI Aaja vya@ta tarI haotaaoya\

k daicata,hIca\ AsaavaI saur}vaata..

AsaM vaaTta AsataaMnaa DaoL\yaaMnaI DaoL\yaaMcaa Gaotalaa vaoQa

tyaa baahulyaa jaNaU var}na paahIlaolyaa

ipaMja%yaasaarKyaa idsata haotyaa

AaiNa tyaata ADk laolaao haotaao maI

mau@ta haoNyaacaI [cCa AsaunadoKaIla

kO d vhavasaM vaaTta haotaM

k arNa ha ipaMjara maaJaa haotaa

jyaacaa maalak haotaao

maI

svata: !

AaiNa hao ha SaovaT naahI,

hI doKaIla saur}vaataMca\

tyaa ipaMja%yaataMca nak Lta Anaok maaNasaM iSarlaI

Gao{}na tyaaMcao ipaMjaro

tyaaMcyaa ipaMja%yaaMnaa taara haotyaa

maaJyaa naahI

mhNauna maI pa`omaata paDlaao

ek imanaIT, ha Ba`ma Aaho maaJaa

ho maaJaM saudOva!!!!

baaL gaBaa-Sayaata vaaZtaM

tassaMca\ Ba`masauQda vaaZtaao

manaata k maI hRd\yaata jaasta

taumhaMlaa saaMgataao,

pauvaI- maaJyaa spaMdnaaMnaI baaLsaM QarlaolaM

paMcaoMid`yaod\vaaro tyaaMnaa AMgaaKaaMd\yaavar KaoLvalaolaM

manaapaasauna

Aataa saQyaa tyaacyaa maRtyaucaI vaaT paahtaaoya\ maI

k arNa Ba`ma naahIsaa JaalyaaiSavaaya

inaYk Ya- k aZU Sak ta naahI

taao k aomaata gaolaaya\ k ayamacaa..

hI Aaho saur}vaataIcaI caahula!

Tuesday, February 9, 2010

रिडायल मेमरी

मोबाईल म्हणजे
माणसं नसलेल्या गर्दीची जागा
जिथे स्क्रोल डाऊन करताना
भेटतात सगळे
सगळा खेळ संपर्काचा
जो अडकलाय आकड्यात
आणि रोज सेव्ह होतात
मेसेजेस
ड्राफ़्टबॊक्समध्ये
जसे अनेक आवंढे असतात ना
साचलेले
ते अचानक साचु लागतात
निर्विकारपणे
सेन्ड न होता
प्रत्येक स्टोर झालेल्या
आठवणीचा इतिहास असतो
तारखेसकट
नसतो फ़क्त
चेहरा
काळाच्या ओघात
फ़िलॊसॊफ़ीनेसुध्दा
टाकलेली असते
कात
तरीही
रिडायल करण्याचा
मोह होतोच
पण तोपर्यंत
नंबरसकट बदललेली असते
व्यक्ती
आणि आपण
उगाचंच काहीतरी शोधत राहतो
डिलिट झालेल्या अनेक
रिसीव्हड कॊल्सचे
संवाद!




Sunday, February 7, 2010

मोक्ष


कुठल्या क्षणी कळेना म्रुत्युशी भेट झाली
तो जन्म् आज् अवघा पदरी तुज़्याच् वाहे

म्रुदगंध सोड्ला जो एकांती आठवाया
वाद्ळात धुमसणारी माझीच् राख आहे

गंगेत सोड्ल्यावर इतरांस मोक्ष मिळतो
तु टिप् गाळ फ़क्त हा मोक्ष अमाप आहे

विसरु नकोस् जेव्हा माझी चिता जळाली
त्या....चौथर्यास आता प्रणयाचा शाप आहे

काही न ऐकला मी तो नाद हुंदक्याचा
ज्योतीत जो मिसळला माझा आलाप आहे

आत्म्याचा शोध कैसा सांगु तुला सखी मी
रक्तात उसळल्या नंतरची ही आर्द्र वाफ़ आहे

तुझ्याच प्रतिक्षेने मी राहीन स्थितप्रज्ञ
विरहात मुक्या शब्दांना केले मी माफ़् आहे

केले मी माफ़् आहे ..........!!

प्रथा


होकार का देई कुणा
जरी असे अव्यक्त ती
स्थित्यन्तराच्या मार्गात
ती बन्ड्खोर वाट्ते

कुणा न उमगला अजून
कायद्याचा स्त्रोत हा
मनाविरुध्द निकालान्चा
तीच थान्ग गाठ्ते

जन्माचे सन्दर्भही
विज्ञानात कोडी खेळ्तात
पुरुषान्चा तोच खेळ्ही
आणि हळु हसुच दाट्ते

सम्भोग हा असा कसा
विक्षिप्त राहतो इथे
नैसर्गिक नियमान्मुळेच
बहुदा स्त्री लागते

मनातली वस्तुस्थिती
ओरबाडली ना कुणी कधी
मान्डुन म्रूगजळाची लक्तरे
दैनिक प्रथा ती सान्गते!

स्थित्यंतरे

अलिप्त हा असा कसा उणा अधिक माणुस हा
होऊन उगाच भ्याड तु बांधु नकोस मंदीरे
नसुनही तमा तुला कशास भीक मागतो
तुझ्याच निर्णयामुळे झाली अनेक स्थित्यंतरे

सांग शोधला कुठे हा दगड मंदीरातला
असुनही अव्यक्त तो तुझ्याविनाच मातला
एका भितीमुळे तुझ्या केला प्रचंड र्हास तु
बांडगुळासम बनविला नाजुक अवघा विश्वास तु

वेगळे करुन काय साधलास स्वार्थ रे
उरलेल्या प्राण्यांची आज ऐक हाक आर्त रे

माणुस बनायची राह्यली अजुन इथेही मर्कटे
स्वतःला धिक्कारणारा असा जगात प्राणी कुठे
वानरास का मिळला हा अनोखा शाप तो
सरल्या किती पिढ्या तरी शोधतो अजुन बाप तो

चालतो जिथे अनंत खंत न जुमानता
जात पात मानुनही देव कणा कणांत मानता?
जवळ जवळ् काही ठिकाणी का वर्ज्य आहेत माणसे
एक दगड समोर फ़क्त उरलेले पायांखालीच जाणता

विचार कर किती जण अद्याप वाट पाहतात
भातुकलीसम कर्मकांड आणि नवस वाह्तात
धैर्यकर मेंदुमध्ये अन् पाऊल टाक तु पुढे
कौल देत घेत अनेक गाभार्यामद्येच थांबतात

स्त्री म्हणजे.....


कदाचित एक शुक्राणु
कदाचित एक बीजांड
कदाचित एक झायगॊट
कदाचित एक जीव
कदाचित एक गर्भपाताचं गिनीपिग
कदाचित एक संकट फ़सलेल्या गर्भपातामुळे
कदाचित एक प्रश्न पुरुषांसाठी
कदाचित एक उत्तर स्त्रीयांसाठी
कदाचित एक मानसिक पण सामाजिक उलथापालथ
कदाचित एक जन्म
कदाचित एक संस्कार
कदाचित एक भीती
कदाचित एक मान (अद्याप खाली न गेलेली)
कदाचित एक मन:स्ताप (तिचाच स्वत:चा)
कदाचित एक वाढणारं वय (जे पुरुषांना सहज दिसतं डोळे बंद करुनही)
कदाचित एक पाळी (संघर्ष स्विकारण्याचीच बहुदा)
कदाचित एक चिंता (इतरांना तिची)
कदाचित एक संस्कॄती (सगळ्यांनीच लादलेली)
कदाचित एक प्रेम
कदाचित एक वासना अल्लड (ज्यास विरोध केलाच जातो)
कदाचित एक बंड (कुठ्ल्याही पुस्तकात न छापलेला)
कदाचित एक युध्द (स्वत:शी)
कदाचित एक जीत (स्वत:शीच)
कदाचित एक हार (ती पत्करावी असा अनेकांचा नियम)
कदाचित एक नातं (जे तिला सिध्द करुन दाखवावंच लागतं)
कदाचित एक काळ (ज्यात भविष्य नसतं)
कदाचित एक सौदा (समाजात त्याला लग्न म्हणतात)
कदाचित एक देवी (वेदांमध्ये लिहल्याप्रमाणे)
कदाचित एक वॆश्या (ज्यांना देवीवर विश्वास नाही व अनेकांना असं म्हणायचंही असतं)
कदाचित एक पत्नी (जिच्यासाठी पती "परमेश्वर" असतो.पत्नीसाठीचे वेद अजुन लिहीलेले नाहीत)
कदाचित एक आई (कारण तिची इच्छा)
कदाचित एक सुरुवात (जगाची)
कदाचित एक शेवट (संयमाचा)
कदाचित एक तत्वन्यान (अडाणी असुनही)
कदाचित एक अभिनय (कदाचित हरल्याचाच!)
कदाचित एक स्त्री (हे बदलु शकते.....)









Friday, February 5, 2010

थैमान


कुठल्या क्षणी कळाले
आहे मी चंद्र अवघा
ती रात्र एक होती
अन् देत होती झोका

त्या देह पाळण्याच्या
सांभाळल्या मी वेली
रुजता हळुच् फ़ांदी
पारंबी तप्त झाली

ह्रुदयावरी सखीच्या
मोहोरही बहरला
वाटेत पर्वताच्या
ओहोळही निसटला

थैमान वादळांचे
जैसे असे कविता
अर्थांचा थांग सारा
शोधी तो न भीता

उत्स्फ़ुर्त भावनेचा
बनलो मी चित्रकार
उधळुन रंग सारे
गर्भात निर्वीकार

रचल्या सुरावटींचे
आलाप शांत झाले
निशेत हे निसर्ग
उध्व्स्त प्रांत झाले

काही नियम......


आंधळ्यांना स्वप्न् दिसाव्
अगदी तसेच भास् आहेत
तुझे...
डोळस् करणारे.


न दिसणार्या अनेक् गोष्टिंना
अस्तित्व असतं...पण्.....तुला नाही.
वारा वाह्तो
सूर् ऐकु येतात
दरवळतो गंध
गहिवरतात संबंध...


त्या पाझरलेल्या अश्रुंच्या तळ्यात
मी चार् हि प्रहर्
देत असतो अर्घ्य
अंधाराला.....
सांग त्या सुर्याला मी मोड्ला
नियम.


त्या उरलेल्या शाईला
मी कोर्या कागदांवर सांडतो
जेव्हा सुचते कविता....
सांग् त्या रेषांना
मी व्यक्त होण्याचा
मोड्ला नियम.


त्या सुटणार्या प्रत्येक
श्वासाला
क्षणभर कोंडलय
अनुभवण्यासाठी
आता सांग त्या नियतीला
मी.....
जगण्याचा....
मोडतोय
नियम्!


नियम मोडायला तिनेच भाग पाडलं
कारण.....
म्रुत्युला नसतात नियम
मनाचे
आणि जर खरंच
नियमांमुळे बंधन येतं
तर...
तिला जाळण्यापुर्वी ...
मला काही नियम् बनवायचे आहेत
बस् इतकच्....!!!

गोगलगाय !!




गोगलगायच्या स्वप्नात हत्ती आला तर?
तर?..........
तिच्या इमॆजीनेशनला द्यावी लागेल दाद !
पण, तरीही गोगलगायला हत्तीचं
स्वप्न का पडावं?
नका विचार करु,
तो
सर्वस्वी
तिचा प्रश्न आहे.....
तिच्या स्वप्नांत हत्ती येतो
आणि आपल्या???
आपल्या स्वप्नांत
हत्तीएवढे
संदर्भ येतात.
मुंगीचं भार काय असतो
तो तेव्हाचं कळतो
आणि एकदा पडलेलं
स्वप्न
पुन्हा दिसत नाही
आणि पुन्हा पुन्हा दिसणारं
स्वप्न
आपण टाळतो
कारण ते
केव्हाही पाहू शकतो
ते पाहताना केव्हाही
डोळे उघडू शकतो
जागं राहू शकतो
ठरवूही शकतो !
जसं आवडत्या पुस्तकात
लपवुन ठेवलेलं
जाळीदार पिंपळपान असतं
त्याचा हिरवा रंग जाऊन
शिल्लक राहते
ती जाळी......
ज्यात आपण
असतो ना?
अडकलेले..!
पुष्कळदा
न बोलताच.
मग त्या स्वप्नामध्येच
अजुन एक स्वप्न पडतं
की,
गोगलगायकडे असेल का
असंच
एखादं
पिंपळपान?!
नसावं......
तिच्या स्वप्नांत
हत्ती नाही का येत?!?
कदाचित..................................
......
हत्तीएवढं झाल्यावर
तिचा वेग.....वाढेल....
अंतर लवकर पार होईल
पण,
शेवटी ती....
राहणार
फ़क्त
एक
गोगलगाय !!
आणि
ही
गोगलगाय,
आपल्या
स्वप्नांतील आहे
जिथे
आपण रेंगाळतो
पण
ती
बरीच
पुढे असते...............
काळामध्ये अडकणारे
पुढे
कधी जातंच नाही
म्हणुन आपण
मागेमागे पळतो
आठवणींच्या
आणि
गोगलगाय
जिंकते
रेस!
आठवणींच्या पुढे
जाण्याची
स्वप्न
अद्याप
दिसायची शिल्लक आहे.
डोळे बंद करु नका
नाहीतर
पुढे
गेलेली
गोगलगाय दिसायची
आपल्याला मागे
जायचंय
आठवणींच्या

हो ना?