निर्मनुष्य रस्त्यावर
गंमत म्हणुन
टॆंगो केला
सगळ्यांना सांगितलं
हातांच्या व्हॆक्युममधे
आहे कुणीतरी
नाही कळायचं तुम्हांला....
बोटांच्या रिकाम्या जागासुध्दा
भरलेल्या आहेत
घट्ट.....
त्या साध्या डोळ्यांना दिसत नाहीत.....
कुणीतरी अगदी जवळ्देखील आहे
त्याला म्हणतात
भास..!!
कुणीतरी आहे
यापुढे......भासच म्हणुया
हवतरं....
पण मित्रांनो
टॆंगो मात्र रोज झालाच पाहीजे......
हो की नाही??
No comments:
Post a Comment