Wednesday, February 17, 2010

डायलॊग

काल नाट्क झालं
चर्चगेटला
अख्खं ऒडीटोरीयम हाऊसफ़ुल्ल....
आणि मी बसलेलो
रिकामं मन घेऊन....
त्या सीट्वर.
स्वत:ला प्रश्न विचारत
जिच्या वेडापायी लेखणी
हातात घेतली
ती यापुढे सोबत नसणार?
का...?
आता नाट्कातला एकही डायलॊग
ऎकू येत नव्हता
साखळी बनत होती
प्रश्नांची
न तुटणारी
माझ्या
उत्तरांनी
चेहरा लपवलेला
निर्लज्जपणे.....
मग, मध्येच टाळ्यांचा कडकडाट ऎकू यायचा
कारण नाटकातल्या प्रत्येक वाक्यावर तिचा हक्क आहे
थियटरच्या काळोखात जोरात किंचाळावसं वाटलं
कि....थांबवा हे नाटक.....!!!!!!!!!!!!!!!
मला माझंच आयुष्य चव्हाट्यावर आणायचं नाहीये
मला असंच व्यक्त होता येतं
होत राहणार
कारण माझ्याकडे पर्याय नाहीये
माझ्याकडे भविष्य नाहीये
वर्तमान आहे जो फ़क्त सरकतोय
सहा वर्षांपुर्वीही सरकतंच होता
आताही सरकेल
तिच्यामते
"काळ हा सर्व गोष्टींवर उपाय असतो..!"
तर मग ह्या उपायामुळे नॊर्मल झालेले दाखव
अचानक थियटरच्या लाईट्स ऒन झाल्या
नाटक रंगमंचावर संपलेलं
जे संपणारंच होतं
सगळेजण माझ्याकडे पाहत होते
आणि मी मनातल्या मनातंच
गुंतलो
तिच्यासोबत......
तीच देत होती धीर मला
नवी वाक्य जुळवत
पण ...यंदा ती स्वत:शीच वेड्यासारखं बडबडत होती
"The one who sayss what.....if u fall down......i will b your support!!
मी हे वाक्य फ़ारपुर्वी बोलुन गेलेलो
तेव्हा तिने हे ऎकलं नसावं
कदाचित.....
आजकाल तिला सतत
एकच प्रश्न पडतोय
Sometimes you see a person, and you wonder why you?
आता थियटरसुध्दा रिकामं झालेलं
तरीही घुमत होता एकच
प्रश्न....
Sometimes you see a person,
and you wonder
why
you..........?

No comments:

Post a Comment