Wednesday, February 17, 2010

कुतुहल

प्रत्येक शेवटाला एक नवी सुरुवात असते..
तर मोह कशाचा ठेवायचा?
शेवटाचा की...
सुरुवातीचा...!!??
आणि अर्ध्यावर राहीलेल्या गोष्टींबद्द्ल काय??
पश्चाताप? समाधान? सुटका?
की
ती गोष्ट अर्ध्यावर सोडण्यात आपण यशस्वी ठरलो
ह्याचा आत्मविश्वास???
इथे राग नाहीये
आणि कदाचित
उत्तरसुध्दा....!!
काही स्वप्न कुणीतरी पाहण्यास भाग पाडली
ह्याचंच कुतुहल जास्त...!!!

No comments:

Post a Comment