गोगलगायच्या स्वप्नात हत्ती आला तर?
तर?..........
तिच्या इमॆजीनेशनला द्यावी लागेल दाद !
पण, तरीही गोगलगायला हत्तीचं
स्वप्न का पडावं?
नका विचार करु,
तो
सर्वस्वी
तिचा प्रश्न आहे.....
तिच्या स्वप्नांत हत्ती येतो
आणि आपल्या???
आपल्या स्वप्नांत
हत्तीएवढे
संदर्भ येतात.
मुंगीचं भार काय असतो
तो तेव्हाचं कळतो
आणि एकदा पडलेलं
स्वप्न
पुन्हा दिसत नाही
आणि पुन्हा पुन्हा दिसणारं
स्वप्न
आपण टाळतो
कारण ते
केव्हाही पाहू शकतो
ते पाहताना केव्हाही
डोळे उघडू शकतो
जागं राहू शकतो
ठरवूही शकतो !
जसं आवडत्या पुस्तकात
लपवुन ठेवलेलं
जाळीदार पिंपळपान असतं
त्याचा हिरवा रंग जाऊन
शिल्लक राहते
ती जाळी......
ज्यात आपण
असतो ना?
अडकलेले..!
पुष्कळदा
न बोलताच.
मग त्या स्वप्नामध्येच
अजुन एक स्वप्न पडतं
की,
गोगलगायकडे असेल का
असंच
एखादं
पिंपळपान?!
नसावं......
तिच्या स्वप्नांत
हत्ती नाही का येत?!?
कदाचित........................................
हत्तीएवढं झाल्यावर
तिचा वेग.....वाढेल....
अंतर लवकर पार होईल
पण,
शेवटी ती....
राहणार
फ़क्त
एक
गोगलगाय !!
आणि
ही
गोगलगाय,
आपल्या
स्वप्नांतील आहे
जिथे
आपण रेंगाळतो
पण
ती
बरीच
पुढे असते...............
काळामध्ये अडकणारे
पुढे
कधी जातंच नाही
म्हणुन आपण
मागेमागे पळतो
आठवणींच्या
आणि
गोगलगाय
जिंकते
रेस!
आठवणींच्या पुढे
जाण्याची
स्वप्न
अद्याप
दिसायची शिल्लक आहे.
डोळे बंद करु नका
नाहीतर
पुढे
गेलेली
गोगलगाय दिसायची
आपल्याला मागे
जायचंय
आठवणींच्या
हो ना?
तर?..........
तिच्या इमॆजीनेशनला द्यावी लागेल दाद !
पण, तरीही गोगलगायला हत्तीचं
स्वप्न का पडावं?
नका विचार करु,
तो
सर्वस्वी
तिचा प्रश्न आहे.....
तिच्या स्वप्नांत हत्ती येतो
आणि आपल्या???
आपल्या स्वप्नांत
हत्तीएवढे
संदर्भ येतात.
मुंगीचं भार काय असतो
तो तेव्हाचं कळतो
आणि एकदा पडलेलं
स्वप्न
पुन्हा दिसत नाही
आणि पुन्हा पुन्हा दिसणारं
स्वप्न
आपण टाळतो
कारण ते
केव्हाही पाहू शकतो
ते पाहताना केव्हाही
डोळे उघडू शकतो
जागं राहू शकतो
ठरवूही शकतो !
जसं आवडत्या पुस्तकात
लपवुन ठेवलेलं
जाळीदार पिंपळपान असतं
त्याचा हिरवा रंग जाऊन
शिल्लक राहते
ती जाळी......
ज्यात आपण
असतो ना?
अडकलेले..!
पुष्कळदा
न बोलताच.
मग त्या स्वप्नामध्येच
अजुन एक स्वप्न पडतं
की,
गोगलगायकडे असेल का
असंच
एखादं
पिंपळपान?!
नसावं......
तिच्या स्वप्नांत
हत्ती नाही का येत?!?
कदाचित..................................
हत्तीएवढं झाल्यावर
तिचा वेग.....वाढेल....
अंतर लवकर पार होईल
पण,
शेवटी ती....
राहणार
फ़क्त
एक
गोगलगाय !!
आणि
ही
गोगलगाय,
आपल्या
स्वप्नांतील आहे
जिथे
आपण रेंगाळतो
पण
ती
बरीच
पुढे असते...............
काळामध्ये अडकणारे
पुढे
कधी जातंच नाही
म्हणुन आपण
मागेमागे पळतो
आठवणींच्या
आणि
गोगलगाय
जिंकते
रेस!
आठवणींच्या पुढे
जाण्याची
स्वप्न
अद्याप
दिसायची शिल्लक आहे.
डोळे बंद करु नका
नाहीतर
पुढे
गेलेली
गोगलगाय दिसायची
आपल्याला मागे
जायचंय
आठवणींच्या
हो ना?
No comments:
Post a Comment