Tuesday, August 24, 2010

फ़ांदी



तु माझं नाव

मीरा

का ठेवल....?

स्वप्नांत शिरल्या शिरल्या

पहीलाच प्रश्न हा विचारला

तिने !

मी मात्र डोळे घट्ट

मिटले

पण तिचा प्रश्न कायम होता........



स्वप्न रुप बदलत असतांना

तिथल्या प्रत्येक वाटेवरचे

मृगजळ

मीराने

लपवले होते कुठेतरी..!

मी मात्र

हाताची घडी घालुन बसलेलो

तिला बघत

कसल्यातरी पारंब्या खाली....



त्या झाडाला क्षणांची पाने होती

सळसळणारी

एकमेकांत गुंतणारी फ़ांदी होती

कळणारी

मीराने धावत येऊन

मला

झाडाखालनं ढकललं

कारणं........

त्या पारंब्या

माणसांत शिरुन

त्यांना कायमचं फ़ांद्या बनवुन टाकतात



तिच्या हातात

मी एक मृगजळ पाहीलं

गुदमरतांना

तिने पुन्हा तोच प्रश्न विचारला

"माझं नाव मीरा ...का ठेवलंयस तु..??



मृगजळ आता....

तडफ़डू लागलं

तिच्या मिठीत....

मी त्याच्यावर किव येऊन

उत्तर दिलं...

कारण....."तु माझा पाठलाग करावीस म्हणुन...!..

तु स्वत:चं भविष्य ठरवलेलंस

तुझा भुतकाळ अमिबासारखा वाढतोय विभाजन करत

आपल्याच आठवणींचं..!!"



आता तिच्या समोरंच

एक पारंबी

खाली आली....

आणि मला विळखा घालुन

वर नेऊ लागली...



उंचावर गेल्यावर

मला

स्मशान दिसलं

मृगजळांचं !!

तोपर्यंत मी पुन्हा

एक फ़ांदी बनलेलो होतो..!!!!!!!

स्वप्नांत



मीरा

हातातल्या प्रेताला घेऊन निघाली

आणि आता....

मी

तिलाच प्रतिप्रश्न केला....

"तु माझा कृष्ण का केलास...? "



स्वप्नांतुन बाहेर पडता पडता

मीराचा एकेक हुंदक्याला

वीज

दुजोरा देत होती

Friday, August 6, 2010

Touch theory

smooch mechanicle ओठांमधला
neutral करतो इथे भावना
पाळुन मृगजळाचे commitment
romance चा संपतो इथे stamina

cosmeticsच्या थरांत लपते
त्वचा innocent shy अनोखी
G - String चे लगाम सारे
खेचत असतो आमचा jockey

उतरत नाही माज little bit
complaint करते virginity
एकाचेही ना satisfaction
म्हणुन चालते continuity

culture चाही असतो sleevless
खांदा थोडा थोडासा
urbanisation च्या गळाला
डिग्निटीचा लागतो मासा

nudism च्या फ़ांदिवर उंच
झोका obsession घेतो
विचारांचा orgasm आता
philosophy वेगळी देतो

material ही बनते नकळत
सहज अचानक touch theory
आंबा होण्याआधी असते जॆसी
without warmness वाली कॆरी

life मधली monotony
ignore करावी किंवा घ्यावी
strangeness च्या टाळ्याची
explore करावी आपुली चावी

cute असावा rebel क्षणांच
आणि cute असावा end ही
निसर्गाची puncture cycle
सांभाळुन आहे trend ही