Monday, June 21, 2010

ग्राफ़िटी....

अडगळीतल्या आठवणीतुन हवं ते सांगायला, हवी ती व्यक्ती शोधता शोधता....फ़ेसबुकवर कधी आलो ते कळलंच नाही...स्वत:शीच बडबडुन वेड लागण्यापेक्षा...."what's on your mind ?" चा मार्ग बरा वाटला....रादर उपाय..!!...आकाशात ढग जमा होऊन जसा पाऊस पडतो...अगदी तसेच साचतात अनेकदा निगेटीव्ह विचार.....आणि मग कळतं शरीरात घेतलेला श्वास इतका उष्ण का वाटतो..? आपलं बोलणं ऎकायला यापुढे कुणीच नाही हे गृहीत धरुन....फ़ेसबुकवर लॊगिन होतो...आणि मग तिथेही कळतं....इथेही बोलायला खरंच कुणीही नाही....आणि तिथल्या वॊलवर गिरवत जातो....माझीच ग्राफ़ीटी...तास ....अनेक तास...किबोर्डचा रिदम ऎकत......तास....अनेक तास....
फ़ेसबुकवर अनेक माणसं स्वत:ची प्लास्टीक इमेज घेऊन का असतात....नाही तसा फ़ेसबुकवाल्यांनी काही disclaimer नाही टाकलाय...आपण सगळ्यांनी स्वत:च्या मनाला ब्ल्यु टुथसारखं बनवुन टाकलंय...कुठला थॊट कुठे जातोय हे पाठवणार्यालाही माहीत नसतं....कुणाच्या एका रीप्लाय पासुन ते साईन आऊट होईपर्यंत आर्टीफ़ीशल इमोशन्सचा एक वेगळा खेळ इथे सर्वांना जमायला लागलाय....अनेकदा काहीतरी शोधत असतो आपण.....पण आपण तसं काहीतरी करतोय हे सांगण्याचं टाळतो...स्वत:ला देखील...!!आणि नकळत काहीतरी सापडलंय असंही स्वत:ला सांगतो...त्यात एखादी स्टेटमेंट असते...कमेंट असते...पोस्ट असते...चॆट्बॊक्सचा तो हिरवा रंग असतो....आणि असते लिस्ट फ़्रेंड रिक्वेस्ट पाठवलेल्या मित्रांची....बहुदा निर्जीव....बहुदा कॆल्क्युलेटीव...बहुदा जुने .....बहुदा नवे....बहुदा उगाचंच झालेले....बहुदा स्वत:ला रिलेशनशीप मधला खजिना समजणारे....खजिना दोन पावलांवर सापडल्यावर मजा नसते........कुठल्याही गोष्टीची किंमत कळायला वेळ जातो....असंच काहीतरी लॊजिक असावं...लोकांचं एकमेकांबद्दल...किंवा एकमेकांचं लोकांबद्दल ..!! आणि इथेच कल्पनेचा स्पीड थेट 3.1 mbps गाठतो व फ़ेसबुकवर अनेकजण प्रीटेंड करत जगतात,...त्याहीपेक्षा शिकतात !! अनेक विषयांवर अनेकांसोबत चॆट करण्याची आयरनी सापडते ती इथेच....कन्फ़्युज...कन्वींस आणि कमिट ह्याची रॆंडमली मजाही इथलीच....कदाचित!!...ही स्टेटमेंट माझी सोय नाही...पण पार्ट ऒफ़ फ़ॆक्ट नक्कीच आहे. एका व्हर्च्युअल जगात आपण स्वत:ची एक ....वेगळी....ओळख सांभाळतो हे किती इंट्रेस्टींग आणि तेवढंच कॊन्ट्राडीक्टरी आहे....इथला विरंगुळा ते ऒबसेशन मधला काळ ज्याला कळला तोच एंजॊय करु शकतो...आयसोलेशन !! जगण्याचं डेफ़ीनेशन शोधता शोधता अनेक चुरगळलेले कागद सापड्तात इतरांचे... ज्यांनी डेफ़िनेशन शोधण्याचा प्रयत्न केला व अद्यापही करताहेत... त्यांचा मागोवा घेत घेत आपणही पुढे निघुन जातो व तेव्हा लक्षात येतं की ...अरेच्चा, आपलंही काहीतरी म्हणणं आहे...म्हणायचंय !! तिथे आपणही कागदावर गिरवतो काहीतरी...व चुरगळुन फ़ेकुन देतो कागद ...नव्याने जगणं शोधायला...आणि त्याच रस्त्यावर अनेक मागनं चालत येतांना दिसतात...मग कळू लागतं खरं व खोट्यातलं गिमीक....स्टेटमेंट मधनं आयुष्य प्रुव्ह झालं असतं तर....कित्येकांनी आत्महत्या केल्या असत्या !! शेवटी काय तर...इंडीविज्युअल परसेप्शन !! आणि परसेप्शन कन्वींस....दॆट्स ऒल..!!