कृष्णाच्या वेडापायी
शोध घेत घेत
मीरा
कधी स्वार्थी झाली ते तिलाही कळलंच नाही
तिच्या नशिबात प्रेम नाहीये
हे सत्य स्विकारायला ती कधीच तयार नव्हती
म्हणुन तिने शोधला पर्याय
स्वत:पुरता....
आणि तिने स्वत:च ठरवला एक
कृष्ण...
तिच्या अहंकारासाठी
आयुष्यात कधीच दोन दगडांवर पाय ठेऊ नये
म्हणुन एक कृष्ण
त्याच्या बासरीसोबत
दगडाच्या भिंतीआड लपला...
कायमचा
कारण दुसरा कृष्ण खरा आहे
हे पटवुन द्यायचं होतं
मीराच्या अहंकाराचा आदर करत
कायमचा..........