थैमान
कुठल्या क्षणी कळाले
आहे मी चंद्र अवघा
ती रात्र एक होती
अन् देत होती झोका
त्या देह पाळण्याच्या
सांभाळल्या मी वेली
रुजता हळुच् फ़ांदी
पारंबी तप्त झाली
ह्रुदयावरी सखीच्या
मोहोरही बहरला
वाटेत पर्वताच्या
ओहोळही निसटला
थैमान वादळांचे
जैसे असे कविता
अर्थांचा थांग सारा
शोधी तो न भीता
उत्स्फ़ुर्त भावनेचा
बनलो मी चित्रकार
उधळुन रंग सारे
गर्भात निर्वीकार
रचल्या सुरावटींचे
आलाप शांत झाले
निशेत हे निसर्ग
उध्व्स्त प्रांत झाले
No comments:
Post a Comment