Sunday, February 7, 2010

मोक्ष


कुठल्या क्षणी कळेना म्रुत्युशी भेट झाली
तो जन्म् आज् अवघा पदरी तुज़्याच् वाहे

म्रुदगंध सोड्ला जो एकांती आठवाया
वाद्ळात धुमसणारी माझीच् राख आहे

गंगेत सोड्ल्यावर इतरांस मोक्ष मिळतो
तु टिप् गाळ फ़क्त हा मोक्ष अमाप आहे

विसरु नकोस् जेव्हा माझी चिता जळाली
त्या....चौथर्यास आता प्रणयाचा शाप आहे

काही न ऐकला मी तो नाद हुंदक्याचा
ज्योतीत जो मिसळला माझा आलाप आहे

आत्म्याचा शोध कैसा सांगु तुला सखी मी
रक्तात उसळल्या नंतरची ही आर्द्र वाफ़ आहे

तुझ्याच प्रतिक्षेने मी राहीन स्थितप्रज्ञ
विरहात मुक्या शब्दांना केले मी माफ़् आहे

केले मी माफ़् आहे ..........!!

No comments:

Post a Comment