Sunday, February 7, 2010

प्रथा


होकार का देई कुणा
जरी असे अव्यक्त ती
स्थित्यन्तराच्या मार्गात
ती बन्ड्खोर वाट्ते

कुणा न उमगला अजून
कायद्याचा स्त्रोत हा
मनाविरुध्द निकालान्चा
तीच थान्ग गाठ्ते

जन्माचे सन्दर्भही
विज्ञानात कोडी खेळ्तात
पुरुषान्चा तोच खेळ्ही
आणि हळु हसुच दाट्ते

सम्भोग हा असा कसा
विक्षिप्त राहतो इथे
नैसर्गिक नियमान्मुळेच
बहुदा स्त्री लागते

मनातली वस्तुस्थिती
ओरबाडली ना कुणी कधी
मान्डुन म्रूगजळाची लक्तरे
दैनिक प्रथा ती सान्गते!

No comments:

Post a Comment