सत्य स्वीकारणं ही आयुष्यातली
सगळ्यांत मोठी जबाबदारी
आणि ते लपवणं
म्हणजे
आव्हान..!!!
पुष्कळदा स्वत:लाच दिलेलं.....
इच्छा कधीच पुर्ण होत नसतात
त्या फ़सवतात
अगदी
आंधळी कोशींबिरच्या खेळाप्रमाणे....
आपण डोळ्यांना पट्टी लावुन
शोधत राहतो त्यांना....
पण कुठपर्यंत...???
मग स्वत:च खेळ संपावा म्हणुन...
डोळे उघडण्याचा निर्णय घेतो........
आणि सत्य स्वीकारतो
जे आहे ते......
जे दिसेल तसं....
कदाचित खेळ
थांबतो प्रत्यक्षात...
आणि आता डोळे आपोआप बंद होतात
न दिसणारी
आंधळी कोशींबिर खेळायला.....
कायमचे
सतत..!!
Mast...
ReplyDeletethanks gaurav!!!!!!!
ReplyDelete