काही नियम......
आंधळ्यांना स्वप्न् दिसाव्
अगदी तसेच भास् आहेत
तुझे...
डोळस् करणारे.
न दिसणार्या अनेक् गोष्टिंना
अस्तित्व असतं...पण्.....तुला नाही.
वारा वाह्तो
सूर् ऐकु येतात
दरवळतो गंध
गहिवरतात संबंध...
त्या पाझरलेल्या अश्रुंच्या तळ्यात
मी चार् हि प्रहर्
देत असतो अर्घ्य
अंधाराला.....
सांग त्या सुर्याला मी मोड्ला
नियम.
त्या उरलेल्या शाईला
मी कोर्या कागदांवर सांडतो
जेव्हा सुचते कविता....
सांग् त्या रेषांना
मी व्यक्त होण्याचा
मोड्ला नियम.
त्या सुटणार्या प्रत्येक
श्वासाला
क्षणभर कोंडलय
अनुभवण्यासाठी
आता सांग त्या नियतीला
मी.....
जगण्याचा....
मोडतोय
नियम्!
नियम मोडायला तिनेच भाग पाडलं
कारण.....
म्रुत्युला नसतात नियम
मनाचे
आणि जर खरंच
नियमांमुळे बंधन येतं
तर...
तिला जाळण्यापुर्वी ...
मला काही नियम् बनवायचे आहेत
बस् इतकच्....!!!
apratim!!!!!!!!!! kharach mast ahe!!!!!!!!
ReplyDelete