स्वत:च्या पोटर्यांवरची स्ट्रिप खेचुन
माझ्या डोळ्यांसमोर धरली
आणि म्हणाली...
असं करतात वॆक्सिंग..!
तिचा तो वॆक्स्ड झालेला पाय
आता केळीच्या खोडाप्रमाणे
चक्क उघडा होता
तलम
.........स्पर्शाशिवाय हे महत्वाचं..!!
फ़ेकलेल्या स्ट्रिपवर तिच्या शरीरावरची
लव चिटकलेली
जणू कॆनवासवरचं
अबस्ट्रॆक्ट पेंटींग
तोपर्यंत तिने दुसरा पाय घेतलेला
मी अद्याप न्याहळत होतो
तिच्या स्किनवरलं आयसोलेशन
किंचित जरा कुतूहलानेच जास्त
तेव्हा मला त्या छिद्रांमध्ये
एव्हल्युशन ऒफ़ थॊट दिसु लागलं
रिप्रॊडक्शन थियरी दिसली
त्या छिद्रांना जोडुन काही कोडं सुटतंय का...
हा प्रयत्न देखील केला मी...
तिचा आता दुसरा पाय देखील
दिसु लागला
तलम
...........स्पर्शाशिवाय हे महत्वाचं..!!
नको असलेले केस काढुन
मीरा...
मीरा...
मेकेनिकल झालेली पाहीलीये
अनेकदा
तासनतास
अनेकदा
तासनतास
अंगावरला हा ओसाडपणा
तसा अनेकींना आवडतोच
आता मीरा
वॊशरुमकडे चालत गेली
लिंजरीस बाहेर फ़ेकल्या
दरवाजा बंद करुन
मी उरलेली एक स्ट्रीप
उचलुन...
डोळ्यांवर ठेवली
कदाचित नव्या दृष्टीकोनासाठी
तसा अनेकींना आवडतोच
आता मीरा
वॊशरुमकडे चालत गेली
लिंजरीस बाहेर फ़ेकल्या
दरवाजा बंद करुन
मी उरलेली एक स्ट्रीप
उचलुन...
डोळ्यांवर ठेवली
कदाचित नव्या दृष्टीकोनासाठी
No comments:
Post a Comment